वननेस वन – निसर्गासोबत समरसता
कल्याण : संत निरंकारी मिशन आपल्या पर्यावरण संरक्षणाच्या ‘वननेस वन – निसर्गासोबत समरसता’ या उपक्रमाच्या माध्यमातून हरित, संतुलित आणि शाश्वत भविष्याच्या निर्मितीसाठी सातत्याने समर्पित भावनेने कार्यरत आहे.
सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमितजी यांच्या आशीर्वादाने ऑगस्ट २०२१ मध्ये सुरू झालेल्या या अनोख्या उपक्रमाने आज देशव्यापी जनचळवळीचे स्वरूप धारण केले आहे. भारतातील विविध राज्यांमध्ये आतापर्यंत सुमारे ३५० वृक्ष समूह स्थापित करण्यात आले आहेत. तसेच ६०० हून अधिक ‘वननेस वन’ स्थळांवर श्रद्धाळू आणि सेवादलाचे स्वयंसेवक पूर्ण समर्पणाने या वृक्षांचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत.
या सातत्यपूर्ण प्रयत्नांना पुढे नेत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे रविवार, २३ ऑगस्ट रोजी या महाअभियानाच्या सहाव्या टप्प्याचा शुभारंभ करण्यात येणार आहे. देशभरातील ग्रामीण तसेच शहरी भागांतील ६३० ठिकाणी एकाच वेळी या अभियानाचे आयोजन करण्यात येणार आहे. या निमित्ताने मिशनचे लाखो श्रद्धाळू आणि स्वयंसेवक समर्पित भावनेने सहभागी होत सुमारे १० लाख रोपांची लागवड करणार आहेत.
या अभियानाचे वैशिष्ट्य म्हणजे मिशन केवळ रोपे लावण्यापुरती आपली जबाबदारी मर्यादित ठेवत नाही, तर ती रोपे वृक्ष होईपर्यंत त्यांचे सातत्याने संरक्षण करण्याचा संकल्पही पूर्ण करते. प्रत्येक रोपाची तीन ते पाच वर्षे नियमित देखभाल केली जाणार आहे, जेणेकरून त्यांची योग्य वाढ होऊन ते घनदाट लघुवनांचे स्वरूप धारण करतील, जैवविविधता समृद्ध करतील.















Leave a Reply