डोंबिवली ( शंकर जाधव )
आषाढी एकादशी निमित्ताने लोकमान्य गुरुकुल आणि टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाने दिंडी काढली होती. पालखी मध्ये विठ्ठल रखुमाईची मूर्ती ठेवून प्रथम पालखीची लोकमान्य गुरुकुलाच्या मुख्याध्यापिका सौ अर्चना पावडे व टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री खेमजी राऊत,जोशी यांच्या हस्ते पालखी ची पूजा करण्यात आली. नंतर दिंडीची सुरुवात करण्यात आली. दिंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेश परिधान केले होते. लोकमान्य गुरुकुलाच्या विद्यार्थिनी व टिळकनगर कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी यांचे एकत्रित लेझीम पथक तयार करण्यात आले होते. दिंडीत ढोल व लेझीमच्या तालात रिंगण करून खेळ करण्यात आले. दिंडीमध्ये विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत आनंदाने, उत्साहाने फुगड्या खेळत ,लेझीम खेळत ही दिंडी एमआयडीसी मधील गणपती मंदिर येथे नेण्यात आली. गणपतीमंदिरात सर्व शिक्षक व विद्यार्थी यांनी गणपतीची व विठ्ठलाची आरती केली.या दिंडीमध्ये लोकमान्य गुरुकुलाचे सर्व विद्यार्थी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच टिळक नगर कनिष्ठ महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. मोठ्या उत्साहात, आनंदात दिंडी काढण्यात आली. आनंदोत्सव साजरा करण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापिका अर्चना पावडे यांनी दिली.














Leave a Reply