डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील आयरे रोड येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार 17 तारखेला शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या हस्ते भाविकांना तूळशीची रोप देण्यात आले. आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रखुमाई मंदिरात पहाटे चार वाजल्या पासूनच भक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती. ज्या भाविकांना पंढरपूरला जाता येत नाही अशा भक्तांसाठी शिवसेना शहर प्रमुख तथा स्थानिक माजी नगरसेवक राजेश मोरे यांनी आयोजन केले होते. उपवास असणाऱ्या भक्तासाठी साबुदाणा खिचडी, केळी असा उपवासाचा आहार ठेवला होता.विठ्ठवल रखुमाई साठी तुळसी माळा आणि प्रत्येक भक्ताला दर्शन झाल्यावर तुळशीचे रोपटे भेट देण्यात आले. मंदिरातील भक्तीमय वातावरणात वारकरी मंडळींनी भजन व कीर्तन केले.यावेळी शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे म्हणाले मुंबई- पुणे एक्सप्रेस येथे झालेल्या वारकऱ्यांचा बस अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत,जखमीचा पुर्ण खर्च शासन करणार आहे. यावेळी गजानन व्यापारी यांसह अनेकजण उपस्थित होते.














Leave a Reply