इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू

कल्याण शीळ रोडवर विको नाका परिसरात ग्लोब स्टेट इमारतील घटना

डोंबिवली ( शंकर जाधव ) : मित्रांसोबत मस्करी करत असताना एका महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली कल्याण शीळ रोडवर घडली. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगीना देवी मंजिराम असे या मूत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विको नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी मंजिराम ही महिला साफसफाईचे काम करते. नगीनादेवी डोंबिवली पूर्वेतील पिसवली परिसरात राहते. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.आज दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. ती बसली असताना तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करीत होता. याच दरम्यान तिच्या सहकाऱ्याचा हात तिला लागला आणि त्यांचा तोल गेला.दोघांचा तोल गेल्याने नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडून तिचा मृत्यू झाला. मात्र तिचा सहकारी थोडक्यात बचावला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *