नेरळमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणी शिबिर…
कर्जत, प्रतिनिधी, नितीन पारधी
कर्जत तालुक्यातील महिलांची आरोग्य तपासणी तसेच प्रामुख्याने कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन कर्जत तालुका आगरी समाज संघटनेच्या माध्यमातून २० सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. तसेच रोटरी क्लब देवनार, मुंबई यांच्या माध्यमातून कर्करोग तपासणी शिबीर घेण्यात आले. महिला रुग्णांची तपासणी रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर यांच्या माध्यमातून करण्यात आले.
या शिबिरामध्ये अनेक महिलांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतले.२० डॉक्टरांचे पथक यावेळी तैनात करण्यात आले होते. कर्करोग तपासणी साठी रोटरी क्लब यांनी प्रमुख पुढाकार घेण्यात आला होता. ३० डॉक्टर आणि समुपदेशक यांची टीम रोटरीकडून या शिबिरासाठी तैनात करण्यात आली होती. तसेच या शिबिरात ज्या महिलांना या रोगाचे निदान झाले आहे त्या महिला रुग्णावरील उपचार केले जाणार आहेत. त्या रुग्णांची जबाबदारी देवनार रोटरी क्लब अध्यक्षा अलका मुरली, यांच्याकडून घेण्यात आली आहे. या शिबिरासाठी कर्जत तालुक्यातील सर्व विभागातून महिला आरोग्याची तपासणी करण्यासाठी आल्या होत्या, आशा वर्कर अंगणवाडी सेविका यांनी देखील आपल्या आरोग्याची तपासणी करून घेतली.















Leave a Reply