कला आणि संस्कृती संगम असलेल्या टिटवाळा महोत्सव 2025 शुभारंभ संपन्न

Screenshot 5 1 2025 222514 Web.whatsapp.com

टिटवाळा : टिटवाळा येथे 2025 चा भव्य महोत्सवाचा शुभारंभ आज अनेक मान्यवर व असंख्य टिटवाळाकरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 5 जानेवारीपासून सुरू होत असलेला हा उत्सव 15 जानेवारीपर्यंत रंगणार आहे. या महोत्सवात नागरिकांसाठी, लाहान मुलांसाठी , विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांचा सन्मान असे भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या महोत्सवाचे हे ९ वे वर्ष आहे.

महोत्सवाची सुरुवात आज उदघाटन सोहळ्याने कारण्यात आली . यावेळी कल्याण डोंबिवली महानगरपालिका सचिव किशोर शेळके यांच्या हस्ते प्रवेशद्वारावर फित कापून टिटवाळा महोत्सव 2025 चे  उद्घाटन करण्यात आले .यांनतर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रज्वलीत करत , गजू पंडित यांच्या हस्ते कार्यक्रमस्थलाचे पूजन करत मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. श्रीगणेशाच्या सुंदर अश्या नृत्य कलाकृतीने या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी उपस्थित पाहुण्यांचे शालश्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.

Whatsapp Image 2025 01 05 At 8.48.37 Pm

टिटवाळा महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ११ दिवसांमध्ये होणार आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये पाककला स्पर्धा, लावणी स्पर्धा, मेकअप स्पर्धा, आणि आमदार ट्रॉफी ब्रास बँड स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले आहे. तसेच नामांकित लाईव्ह संगीताचा कार्यक्रम असा भरगच्च कार्यक्रम या दिवसांत होणार आहे. प्रत्येक दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत मान्यवरांचा सन्मान होणार आहे.या कार्यक्रमात दररोज महिलांसाठी सोन्याच्या नथ सह ५ वस्तू जिंकण्याची सुवर्णसंधी लकी ड्रॉ च्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे. तसेच १४ जानेवारी महोत्सवाचे आयोजक विजय (भाऊ ) देशेकर यांचा वाढदिवसानिमित अभिष्टचिंतन सोहळा तसेच विशेष अश्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . बुधवार, १५ जानेवारी रोजी लाईव्ह ऑकेस्ट्रा, खुले व्यासपिठ, धांगडधिंगा, फुलमस्ती या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

टिटवाळा महोत्सव हा स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडवणारा आणि नागरिकांना एकत्र आणणारा सोहळा आहे. नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन कला, संस्कृती आणि स्पर्धांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक विजयभाऊ देशेकर करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आलेल्या निधीतून टिटवाळाकरांसाठी एक रुग्णवाहिका घेण्याचा मनोदय यावेळी देशेकर यांनी बोलून दाखविला . आजच्या उद्घाटना प्रसंगी याप्रंगी अजय मिश्रा – मांडा टिटवाळा युवा अध्यक्ष, सुनील वायले , माजी नगरसेवक व उपशहर प्रमुख शिवसेना , रूपेश सपकाळ, (विभाग प्रमुख शिवसेना वायले नगर ) मंगेश गोडे उपशहर‌प्रमुख युवासेना शिववेना, महेश जाधव उपशाखाप्रमुख ( वायालेनगर ), अनंता गायकवाड ,निखिल विशे ,(युवासेना उपशाखा प्रमुख वायले नगर ).राजन चौगुले युवासेना (वायले नगर ) , संतोष देशेकर , दिलीप राठोड आदिंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *