कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण महिला मंडळ व डायनॅमिक स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी महाराष्ट्र स्टेट टेबल टेनिस असोसिएशन सोबत राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. 3 ते 7 जुलै या कालावधीत स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी 700+ स्पर्धक सहभागी होतील असा अंदाज आहे. ही स्पर्धा सावळाराम संकुल येथील बाजपेयी बंदिस्त सभागृह, डोंबिवली पूर्व (बॅडमिंटन हॉल) येथे होणार आहे.
कल्याण डोंबिवली परिसरांत अशी राज्यस्तरीय स्पर्धा तब्बल १५-१६ वर्षानंतर होत आहे. या परिसरांत स्पर्धेच्या निमित्ताने टेबल टेनिस या खेळाचा प्रसार व्हावा तसेच खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेची संधी मिळावी आणि राष्ट्रीय पातळीवरचे त्यांचे गुण वाढावेत हा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी 9769796090 / 9820167160 या नंबर वर संपर्क करावा.














Leave a Reply