कल्याण : कुणाल म्हात्रे
या मोसमातील एमएसटीटीएस टीडीटीटीए मंजुर पहिली राज्यस्तरीय टेबल टेनिस स्पर्धा डोंबिवली येथिल सावळाराम क्रिडा संकुल येथे ३ जुलै ते ७ जुलै या काळात संपन्न झाली. या स्पर्धेस महाराष्ट्रातील कानाकोपर्यातुन तब्बल ९५६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन डायनॅमिक स्पोर्ट्स यांनी कल्याण महिला मंडळाच्या सहयोगाने केले होते. इतक्या प्रचंड संख्येने खेळाडुंचा स्पर्धेतील सहभाग कोविड नंतर पहिल्यांदाच असल्याचे एमएसटीटीए चे पदाधिकारी व टीडीटीटीए चे सचिव यतिन टिपणीस यांनी सांगितले.
११,१३,१५,१७,१९ वर्षां खालील व स्त्री पुरूष या सर्व गटांमधील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. अत्यंत रंगतदार झालेल्या या स्पर्धांमध्ये खेळाडूंचा कस लागत होता. विजेत्यांनी अत्युच्च दर्जाचा खेळ करत अंतिम विजय मिळवला. या विजेत्यांना राष्ट्रीय स्पर्धेत खेळायची संधी लवकर मिळावी या उद्देशाने हि स्पर्धा भरविल्याचे आयोजकांनी सांगितले.
एमएसटीटीए व टीडीटीटीए तसेच त्याचे वरिष्ठ अधिकारी सचिव यतीन टिपणीस, आमदार रविंद्र चव्हाण, कल्याणमधील दळवी बंधू, शेटेज इन्स्टिट्युट, रोटरी क्लब ॲाफ न्यु कल्याण, कल्याण पश्चिमचे माजी आमदार नरेंद्र पवार, माजी केंद्रिय मंत्री कपील पाटिल , वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यानी दिलेल्या बातम्या, कडोंमपा, विद्युत विभाग अशा अनेकांच्या सहकार्याने व सहभागाने हि स्पर्धा यशस्वी संपन्न झाली असे आयोजकांनी सांगितले व त्यांचे मनापासून आभार मानले. पारितोषिक वितरणानंतर हि स्पर्धा समाप्त झाली.














Leave a Reply