डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी जंतूनाशक फवारणी व स्वच्छता उपक्रम
टिटवाळा: डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथरोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतर्फे विविध प्रभागांमध्ये युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम आणि जंतूनाशक फवारणी करण्यात आली. २२ ऑगस्ट २०२५ रोजी अ प्रभागात जंतूनाशक फवारणी पार पाडण्यात आली. ड प्रभागातील वॉर्ड क्र. १०२ मधील सप्तशृंगी चाळ आणि समर्थ नगर परिसरातही ही मोहीम राबवली गेली. जे प्रभागात “डीप क्लिनिंग ड्राईव्ह” अंतर्गत रस्ते, गटारे आणि सार्वजनिक ठिकाणांची सखोल स्वच्छता करण्यात आली. तसेच फ प्रभागातील डोंबिवली पूर्वेतील अयोध्या नगर परिसरात विशेष साफसफाई मोहीम पार पडली. ह प्रभाग क्षेत्रात तर संपूर्ण भागात स्वच्छता व जंतूनाशक फवारणी प्रभावीपणे केली गेली. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले असून, घराभोवती सांडपाणी साचू न देणे आणि डासांची पैदास रोखण्यासाठी दक्ष राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Leave a Reply