कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेची कार्यकारिणी सभा बालक मंदिर संस्थेचे कॅ. र. मा. ओक हायस्कूल मध्ये संपन्न झाली. सभेचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव दिलीप तडवी यांनी केले. यावेळी सभेचे अध्यक्ष म्हणून जगन्नाथ सपकाळे यांची निवड करण्यात आली. त्याला अनुमोदन कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी दिले. मागील सभेचे इतिवृत्त वाचन दिलीप तडवी यांनी केले.
२०२३, २०२४ मधील आर्थिक ताळेबंदाचे वाचन कोषाध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी केले. सहा. सचिव शशि पाटील यांनी वार्षिक नियोजनाची माहिती दिली. यावेळी स्काऊट गाईड सहभाग, शिबिरे, विविध उपक्रम, प्रशिक्षण, युनिट नोंदणी इ. विषयांवर चर्चा झाली. ठाणे जिल्हा संघटक किरण लहाने यांनी संस्थेचे कौतुक करून विविध कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या माध्यमातून सर्व शाळांनी करावे असे आवाहन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना जगन्नाथ सपकाळे यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच सर्वांनी एकत्रित येऊन उपक्रम करावे जेणेकरून संस्थेचा विकास होईल. त्या बरोबरच जास्तीत जास्त युनिट नोंदणी करावी असेही सूचित करण्यात आले.
शेवटी शशी पाटील यांनी आभार व्यक्त केले. या सभेस सहसचिव निवेदिता कोरान्ने, ट्रेनिंग कौन्सिलर दशरथ आगवणे, अपर्णा हर्षे, वैशाली वाबळे, निता जाधव, संजय मुसळे व प्रविण खाडे हे उपस्थित होते.














Leave a Reply