कामोठे येथे 241 निरंकारी भक्तांचे उत्साहपूर्ण रक्तदान

Img3

कल्याण : कुणाल म्हात्रे 

सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणूकीतून ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा’ असल्याच्या भावनेचा अंगीकार करत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने सुषमा पाटील विद्यालय, कामोठे येथे रविवारी आयोजित भव्य रक्तदान शिबिरामध्ये 241 निरंकारी भक्तांनी मोठ्या उत्साहाने रक्तदान केले. संत निरंकारी रक्तपेढी, विले पार्ले, मुंबई मार्फत या शिबिरामध्ये रक्त संकलन करण्यात आले.

या रक्तदान शिबिरामध्ये नेरुळ ते पनवेल भागातील सुमारे 250 निरंकारी भक्तांनी रक्तदान करण्यासाठी स्वेच्छेने आपली नावे नोंदविली होती. यावरुन मानवसेवेच्या प्रति त्यांच्या समर्पित भावनेचे दर्शन घडते. निराकार ईश्वराचे स्मरण करुन आणि सतगुरुंच्या नावाचा जयघोष करत या रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी कित्येग मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या. त्यामध्ये स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर व माजी नगर सेवक डॉ.अरुणकुमार भगत यांचा  समावेश होता. या मान्यवरांनी संत निरंकारी मिशनकडून केल्या जाणाऱ्या मानवसेवेची प्रशंसा केली. मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक वसंत गौड व ब्रांच मुखी बंडू श्रीराम यांच्या देखरेखीखाली सेवादल युनिट नं.1853, युनिट नं.815 आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या स्वयंसेवकांच्या सहयोगाने या शिबिराचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *