कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या तर्फे जुनी डोंबिवलीत मोफत वह्या वाटप

डोंबिवली  ( शंकर जाधव ) :
सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांच्या तर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम राबविण्यात येतो.  भाजपा पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा बाळाराम पाटील यांनी जुनी डोंबिबली व ठाकूरवाडी येथे प्रत्यक्षात वह्यांचे वाटप केले. आनंदीत होऊन हजारो विद्यार्थ्यांनी या वह्या वाटप योजनेचा लाभ घेतला.
डोंबिवली पश्चिम मंडल उपाध्यक्ष कृष्णा पाटील आणि रसिका कृष्णा पाटील यांनी त्यांच्या जुनी डोंबिवली येथील जनसंपर्क कार्यालयात हा मोफत वह्या वाटप  उपक्रम केला. या उपक्रमासाठी गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांनी लांबच-लांब रांगा लावल्या होत्या. यासाठी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या नावांची पूर्वीच नोंदणी करून घेतल्याने वितरण करणे सहज शक्य झाले. रांगेत प्रत्येक विद्यार्थ्यांना वह्या मिळत होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. कॅबिनेट मंत्री तथा तत्कालीन नगरसेवक रवींद्र चव्हाण यांनी सुमारे 20 वर्षांपूर्वी मोफत वह्या वाटप कार्यक्रम सुरू केला होता. गोरगरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप उपक्रम आणि मंत्री रवींद्र चव्हाण असे समीकरण घट्ट झाले आहे. या उपक्रमाला भाजपा पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कृष्णा पाटील यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ अध्यक्ष समीर चिटणीस यांच्या हस्तेहि वह्या वाटप करण्यात आले. वह्या वाटप कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते मनोहर कदम, प्रवीण कांबळी, गणेश कांबळी, तन्मय पाटील, रत्नकांत कुंभार, संदेश पाटील, सिद्धेश साळवी, अविनाश पाटील, दीपक घावरे, राहुल झेपले, रामदास परब, गणेश जाधव, राम सावंत, वसंत देसाई काका, सागर पार्टी, अनिकेत राव, नमिता परब, रीना चव्हाण, प्रतीक्षा कांबळी, सोनम आम्रे, पूनम तळेकर, प्रगती जगताप, योगिता राजपूत, प्रणाली सकपाळ, अपर्णा सावंत, रुपाली चव्हाण, गीता पटेल, अंजली माने आदींनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *