केडीएमसीच्या वतीने शासनाच्या 63 व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेचे आयोजन

कल्याण : क्रीडा व युवक सेवा संचालनालय ,मुंबई, जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने 63 व्या सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सन 2024-25 सब ज्युनिअर, ज्युनिअर मुले व मुलींच्या स्पर्धेचे आयोजन 3 ते 6 जुलै या कालावधीत  शहाड पश्चिम येथील सेंच्युरी रेयॉन कंपनीच्या मैदानावर करण्यात आलेले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे व धैर्यशील जाधव यांच्या हस्ते करण्यात आला.

      या स्पर्धेत एकुण 58 संघ सहभागी होत आहेत. आजचा पहिला सामना सेंट्रल रेल्वे, (कल्याण प.) विरुध्द सेंट मेरी हायस्कुल, चक्की नाका मुलींचा संघ यामध्ये खेळविण्यात आला. या सामन्यामध्ये सेंट मेरी हायस्कुल या संघाने विजय मिळविला. आज दिवसभरात  एकुण 12 सामने खेळविण्यात आले. शुभारंभाच्या सामन्यासमयी अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे व धैर्यशील जाधव यांनी  उपस्थित खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

यावेळी क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या नोडल अधिकारी तथा सहा. आयुक्त स्नेहा करपे, क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे पर्यवेक्षक प्रविण कांबळे, कृष्णा बनगर, क्रीष्णा माळी, दशरथ भांडे, थॉमस सर, अविनाश ओंबासे  इ.क्रीडा शिक्षक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या मुलींचे संघ आणि शिक्षण व क्रीडा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *