जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड व कल्याण तालुक्याच्यातर्फे ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा संपन्न!

मुरबाड- दि.१० -बाळासाहेब भालेराव

जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड व कल्याण तालुका यांच्यावतीने मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा आदित्य रिसॉर्ट रायते येथे संपन्न झाला.
– याप्रसंगी माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांचा ७८ व्या वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांनी केक कापून, गुलाब व सोनचाफा फुलांचा हार,शाल विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सर्व कल्याण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान मुरबाडच्या वतीने कल्याण तालुका ग्रामीण जवळजवळ आठशे ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा घड्याळ,छत्री सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी गोटीरामभाऊ पवार यांनी मला आमदार म्हणून निवडणुकीमध्ये मदत केल्याबद्दल व आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे आभार मानले. जनसेवा प्रतिष्ठान मुरबाडचे अध्यक्ष व ठाणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत गायकर यांनी केले, यावेळी राजाराम चौधरी सर रवींद्र टेंभे, कोंडूनाना भोईर, बुटेरे महाराज यांनी माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांना शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमासाठी रामभाऊ दळवी, कांतीलाल कंटे, पांडुरंग कोर, प्रकाश पवार, अनिल देसले, संजय पवार ,मोहन भावार्थ , अशोक भोईर, सोमनाथ मिरकुटे, संतोष सुरोशी, भगवान कोर , पितांबरे ,तरे शिसवे, माधुरी वाळिंबे , मीनाक्षी जाधव व जयश्री सासे , सरपंच समिता सुरोशी,भूषण जाधव नामदेव टेंभे व कल्याण तालुक्यातील मोठ्या प्रमाणात तरुण व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ,कोंडूनाना भोईर रमेश जाधव रवि टेंभे,चंद्रकांत गायकर गणेश चोरगे,गणेश भोईर, अंनता पवार,रवि देसले यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश तारमले महाराज यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *