जे. एम. एफ.संस्थेत जागतिक योग दिवस साजरा

दिवा,   आरती परब 
जे एम एफ संस्था संचलित जन गण मन शाळा, विद्यामंदिर तसेच ज्युनिअर विद्यालय, वंदे मातरम पदवी महाविद्यालय यामधील सर्व विद्यार्थी शिक्षकांनी योगा करताना संगीत ऐकून एकाच वेळी आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि संगीत दिवस साजरा केला. कार्यक्रमाचे उपस्थित पाहुणे अणूव्रत संस्थेचे पदाधिकारी हेमलता मॅम, विनोद राठोड, रीना मॅम, प्रीती मॅम, ब्रह्माकुमारीज कडून डाॅ निखिल, तेजा दीदी, शामला राव मॅम, वैद्य सर, डाॅ नाडार सर, डाॅ वनिता, ह्यांची उपस्थिती होती, तर संस्थेचे संस्थापक माननीय डॉ राजकुमार कोल्हे, डॉ प्रेरणा कोल्हे त्याच बरोबर इतर पदाधिकारी ह्यांनी सरस्वती पूजन करून जागतिक योग दिवसा बद्दल व जागतिक संगीत दिवसा बद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली.
मन आणि तन निरोगी, आनंदी आणि सुदृढ राहण्यासाठी योगा करणे अतिशय गरजेचे आहे. शरीर निरोगी असेल तर मन आनंदी राहते, आणि मनाला आनंदी ठेवण्यासाठी संगीत ऐकणे गरजेचे आहे, असे डॉ राजकुमार कोल्हे यांनी सांगितले. हळुवार संगीत कानावर पडत असताना शरीर व मन आपसूकच ध्यान धारणेत तल्लीन होऊन जाते हीच योगाची पहिली पायरी व हीच संगीतातली शक्ती आहे, संगीत ही आत्म्याची भाषा आहे, असे डॉ प्रेरणा कोल्हे यांनी सांगितले.
स्वागत समारंभ झाल्यानंतर जागतिक संगीत दिवस कारणाने शिशु विहार ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यानी सुंदर गाणे म्हंटले.त्यानंतर प्रमुख पाहुणे विनोद राठोड यांनी योगा कसा करायचा, ह्याचे प्रात्यक्षिक दाखवले व ते मुलांकडून करून घेतले. त्याच बरोबर प्रीती मॅमने देखील वेगवेगळी आसने मुलांना करून दाखवली. शारीरिक प्रशिक्षक रमेश वग्गे व सौ. वैशाली शिंदे यांनी देखील योग साधना करून दाखवून ती मुलांकडून करून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *