टिटवाळा टाइम्स संपादक संभाजी मोरे यांच्या मातोश्रींचे निधन; समाजसेवा आणि अध्यात्मिकतेचा आदर्श

Img 20250826 wa0041
टिटवाळा : चोरवणे गावठाणातील उतेकरवाडी येथील रहिवासी तथा टिटवाळा टाइम्सचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार संभाजी आत्माराम मोरे यांच्या मातोश्री हिराबाई (शशिकला) आत्माराम मोरे (वय ८५) यांचे मंगळवार दिनांक २६ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे मोरे कुटुंबासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हिराताई म्हणजेच शशिकला मोरे या भारतीय सेनेतील माजी सैनिक आत्माराम भिवाजी मोरे यांच्या पत्नी होत. त्या कुटुंबासाठी आधारस्तंभ आणि समाजात आदर्शवत व्यक्तिमत्त्व होत्या. अत्यंत प्रेमळ स्वभाव, धार्मिकता, आणि कुटुंबप्रेम ही त्यांची ओळख होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटुंबाच्या ऐक्यासाठी समर्पित केले. आजही मोरे कुटुंब एकत्र राहते, हे त्यांचे मोठे योगदान मानले जाते. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. शिवलीलामृताचा अकरावा अध्याय तसेच चातुर्मासातील ग्रंथ त्यांना तोंडपाठ होते. नित्य वाचन हीच त्यांची जीवनशैली होती. त्यांनी नेहमी समाजात आदर्श ठेवला – “आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा.”
गरजूंना मदत करणे, दानधर्म करणे, सर्वांशी प्रेमाने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग होता. कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र ठेवत त्यांनी चार मुलगे, एक मुलगी आणि विस्तारित कुटुंबाला प्रेमाने सांभाळले. संभाजी मोरे यांनीही आपल्या आईवडिलांची सेवा आयुष्यभर अत्यंत प्रामाणिकपणे केली. कोरोनाच्या कठीण काळातही त्यांनी आईच्या सेवेत कोणतीही तडजोड केली नाही. हे त्यांच्या मातृभक्तीचे आणि कर्तव्यदक्षतेचे जिवंत उदाहरण ठरते. अंत्यविधी आज (मंगळवार) रात्री ८ वाजता चोरवणे उतेकरवाडी येथील स्मशानभूमीत पार पडणार आहे. नातेवाईक, समाजबांधव आणि आप्तेष्ट यांना याबबची माहिती मिळताच्या मोठ्या संख्येने ते मोरे यांच्या मुळ गावी रवाना झाले आहेत .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *