टिटवाळा येथे भैरवनाथ हेल्थ वेलनेस सेंटरच्या उद्घाटन सोहळा संपन्न

Whatsapp Image 2025 01 15 At 9.43.45 Pm (1)

टिटवाळा येथे भैरवनाथ हेल्थ वेलनेस सेंटरच्या उद्घाटन सोहळा संपन्न

टिटवाळा : टिटवाळा (पूर्व) , रेजेन्सी रोड येथील भैरवनाथ हेल्थ वेलनेस सेंटरचे उद्घाटन काल रात्री मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्याला अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती लावली होती . सध्याच्या धावपळीच्या युगात आपल्या आरोग्याकडे अनेकांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे . जेवण्याची आणि झोपण्याची अनिश्चित वेळ , कामाचा त्रास , प्रवासाची दगदग, जंकफुड्सचा अतिरेक या सगळ्यामुळे आपल्या आरोग्यची हेळसांड होत आहे . या सगळ्यावर तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन घेऊन आपल्या आहारात आणि जीवन शैलीत काय काय बदल केले पाहिजेत . याविषयी या भैरवनाथ हेल्थ वेलनेस सेंटरमध्ये मार्ग्दर्ष्ण करण्यात येणार आहे .
शिवाजी गोपाळघरे यांच्या हस्ते भैरुनाथ हेल्थ आणि वेलनेस सेंटर टिटवाळा या सेंटरचं उद्घाटन संपन्न झाले .याप्रसंगी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, भाजपाचे शक्तिवान भोईर , दीपक कांबळे , मनसेचे बंदेश जाधव यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमात हेल्थ वेलनेसच्या महत्त्वावर चर्चा झाली आणि आरोग्य सेवा सुविधा स्थानिक जनतेपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. सुरु करण्यात आलेल्या हेल्थ वेलनेस सेंटरचा जास्तीत जास्त नागरिकांना त्यांचे आरोग्य सुंदर , सदृढ राखण्यासाठी लाभ होईल असे यावेळी आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.तसेच आरोग्य विषयक सल्ल्यासाठी संपर्क करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले .

संपर्क: ९३२४८५३३५५.

Whatsapp Image 2025 01 15 At 9.43.44 Pm (1)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *