टिटवाळा येथे योग विद्या धामतर्फे विनामूल्य प्राणायाम साधना आरंभ वर्गांचे आयोजन

Yoga

टिटवाळा , वार्ताहर : टिटवाळा येथे डोंबिवलीतील योग विद्या धाम संस्थेच्या वतीने सर्वसामान्य नागरिकांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम साधना आरंभ वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गांचा उद्देश नागरिकांना आरोग्यदायी आणि शांत जीवन जगण्यासाठी योग आणि प्राणायामाचे महत्त्व पटवून देणे हा आहे. विशेष म्हणजे हे सर्व वर्ग विनामूल्य असून कोणालाही सहभागी होता येणार आहे. वर्गांचा कालावधी 9 नोव्हेंबर 2025 पासून 16 नोव्हेंबर 2025 पर्यंत ठेवण्यात आला आहे. या कालावधीत टिटवाळा आणि परिसरात विविध ठिकाणी हे प्राणायाम साधना वर्ग भरवले जाणार आहेत.

शालिनी स्मृती नांदप रोड मांडा टिटवाळा येथे दररोज सकाळी 8 ते 9 या वेळेत वर्ग होईल. सुलोचना शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण विद्या मंदिर शाळा येथे सायंकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत साधना वर्ग घेण्यात येईल. श्री गणेश मंदिर टिटवाळा येथे सकाळी ६:३० ते 7:३० दरम्यान वर्ग भरवला जाईल. तसेच हनी बनी इंग्लिश स्कूल खिसमतनगर हाऊस गोवेली रोड टिटवाळा येथे सकाळी 7 ते 8 या वेळेत प्राणायाम साधना वर्ग आयोजित करण्यात आला आहे.या वर्गांसाठी सहभागी होणाऱ्यांनी स्वतःची सतरंजी किंवा योगा मॅट घेऊन येण्याची विनंती आयोजकांनी केली आहे. योग विद्या धाम या संस्थेच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून समाजात योग साधना आणि प्राणायामाच्या प्रसाराचे कार्य चालू आहे. यामुळे नागरिकांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मानसिक स्थैर्य वाढीस लागते.टिटवाळा परिसरातील नागरिकांनी या विनामूल्य प्राणायाम साधना आरंभ वर्गाचा लाभ घेऊन आरोग्य आणि आनंदाने भरलेले जीवन जगावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

वर्गांबाबत अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 9930570969, 9773815549, 7506226118 आणि 7303093838 यावर संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *