टिटवाळा येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न

टिटवाळा:  एस बी खराडे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.बी.के. इंटरनॅशनल स्कूल बल्यानी,टिटवाळा (ईस्ट )आणि हिराली फाउंडेशन तसेच सामाजिक वनविभाग बदलापूर आणि वनक्षेत्रपाल विभाग कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी, दिनांक ६ जुलै २०२४ रोजी सकाळी दहा वाजता आडिवली, टिटवाळा (ईस्ट ),तालुका -कल्याण, जिल्हा -ठाणे येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

एस.बी. खराडे संस्थापक/अध्यक्ष, सचिव ॲड.ज्योती खराडे, माननीय सभासद सुभाष बागडे सर , मार्तंड खराडे, अतिथी डॉक्टर .नितीन बेलोसे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून कार्यक्रमाची सुरुवात  एस. बी. खराडे सर यांनी फणसाचे रोप लावून केली. के.बी.के इंटरनॅशनल स्कूल चे विद्यार्थी,शिक्षकवृंद आणि हिराली फाउंडेशन चे स्वयंसेवक अमन सिंग व त्यांचे सहकारी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह.शिक्षिका सौ.म्हात्रे मॅडम यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नवले मॅडम यांनी झाडे लावल्याने तापमानाचे नियमन कसे होते ,आज लावलेले झाड उद्या कशी मदत करू शकते याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून वृक्षारोपणाचे महत्व पटवून दिले .प्रत्येक विद्यार्थ्यांनी दरवर्षी किमान एक झाड लावावे कारण त्यामुळे जागतिक तापमान वाढीविरुद्ध लढण्यास मदत होईल असेही त्यांनी सुचवले. कार्यक्रमास के.बी.के इंटरनॅशनल स्कूलचा शिक्षक वृंद उपस्थित होता.सहशिक्षिका कुमारी रंजना पाल मॅडम यांनी कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *