मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न संपन्न
टिटवाळा : मांडा-टिटवाळा शिवसेना विभाग ,टिटवाळा महोत्सव समिती व आ.विश्वनाथ भोईर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विजय देशेकर यांच्या वतीने माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले .रविवार दिनांक 30 जून रोजी सकाळी १०:०० वा. पटेल मार्टच्या वरती प्रशस्त हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी तसेच पालकांनी उपस्थिती लावली होती.
यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार विश्वनाथ भोईर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की आयुष्यात शिक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे. शिक्षणाशिवाय आपली प्रगती नाही. कितीही संकट आली तरी तुमचे शिक्षण थांबवू नका. काहीही गरज लागली तरी आम्ही तुमच्यासोबत आहोत . यावेळी आमदार विश्वनाथ भोईर फाऊंडेशन आणि टिटवाळा महोत्सव समितीच्या माध्यमातून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना छत्र्यांचे वाटप केले. या कार्यक्रमाला शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, शहर प्रमुख रवी पाटील, विधानसभा संघटक मयूर पाटील, महाराष्ट्र रेडिओ लॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, आयोजक तथा उपशहर प्रमुख विजय देशेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या गुणगौरव सोहळ्यामध्ये डॉ. प्रशांत पाटील ,श्री.बजरंग रजपूत, ॲड.श्री.सागर वाकळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मोलाचे मार्गदर्शन केले. एवढ्या मोठ्या प्रमाणात टिटवाळ्यात प्रथमच विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजित केल्याचे पाह्यला मिळाले.














Leave a Reply