डोंबिवलीत ‘ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ शिबिराला उत्फूर्त प्रतिसाद

डोंबिवली ( शंकर जाधव ) :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ डोंबिवलीतील लाडक्या बहिणींना घेता यावा यासाठी पूर्वेकडील टंडन रोडवरील प्रगती कॉलेज सभागृहात डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ सगळ्या महिलांना मिळावा म्हणून हे शिबीर घेण्यात आले आहे. अगदी तळागळाच्या महिलांना आपला अर्ज यामुळे भरता येणार आहे. दोन दिवसाचे हे शिबिर असून शनिवारपासून लाभार्थी महिला अर्ज घेण्यासाठी शिबिराला भेट देत आहेत. योजनेचा लाभ मिळण्यासाठी लागणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची सरकारी सेतू कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांचीही उपस्थिती ठेवण्यात आली आहे.योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन अर्ज करायलचा आहे. यासाठी लाभार्थ्यांचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटूंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.) तो नसल्यास पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जरूर आहे. त्यासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड आवश्यक आहे. तसेच परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचा जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाइल सर्टिफिकेट) द्यावे. त्याचबरोबर सदर योजनाच्या अटि-शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावयाचे आहे अशी विस्तृत माहिती शिवसेना पदाधिकारी शिबिरातून अर्ज घेऊन जाणाऱ्या महिलेला देत आहेत.

योजनेसाठी लागणारी सर्टिफिकेट नसतील तर त्यासाठी सरकारी सेतू कार्यालयाचे कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात डोमासाईल सर्टिफिकेट, उत्पन्नाचा दाखला मिळण्याची व्यवस्था केली आहे. याबाबत राजेश मोरे यांनी सांगितले की, दोन दिवसांच्या शिबिराचा मुख्य उद्देश महिलांना कोणतीही अडचण येऊ नये. प्रत्येक लाभार्थी बहिणीला या योजनेचा लाभ घेता यावा. यासाठी आमचे पदाधिकारी मेहनत घेत असून दोन दिवसात हजारो महिलांना या योजनेचा लाभ निश्चित मिळेल.

रविवारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत शिबिराला शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी शिबिराला भेट दिली. या योजनेचा राज्यात सुमारे वीस लाख लाडक्या बहिणी लाभ घेण्याचा अनुमान आहे तर जिल्ह्यात लाख बहिणींना याचा लाभ मिळेल. आजच्या या शिबिरात हजारो बहिणींनी येथे भेट दिली आहे. यावेळी शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, सचिव संतोष चव्हाण, गजानन व्यापारी, नगरसेवक रणजित जोशी, रवी आंबो म्हात्रे, दिनेश शिवलकर, कविता गावंड, शिल्पा मोरे, सारिका चव्हाण,संदीप सामंत,तुषार शिंदे आदी उपस्थित होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *