गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे पुष्टी करणे बाकी आहे
कल्याण : कल्याण येथील रहिवासी मोटिव्हेशनल स्पीकर दिनेश गुप्ता यांनी विरार पूर्व येथील सेंट पीटर्स इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात एका मिनिटात 95 जणांना मिठी मारून 88 चा जुना विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने याची पुष्टी करणे बाकी आहे. रेकॉर्डशी संबंधित सर्व पुरावे, कागदपत्रे, व्हिडिओ, फोटोग्राफी, साक्षीदारांची साक्षीपत्रे पाठवण्यात आली आहेत. लवकरच गिनीजकडूनही याबाबत घोषणा करण्यात येणार आहे.
या रेकॉर्डचे मुख्य साक्षीदार म्हणून प्रा.अनिता गुप्ता, राजेंद्र दाभोळकर उपस्थित होते. उत्कर्ष राऊत आणि ख्रिस गोन्साल्विस हे टाइमकीपर अधिकारी म्हणून उपस्थित होते. शाळेत शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी विशेष योगदान दिले. हा विक्रम रचण्यात सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल, विरार पूर्व येथील शाळा प्रशासनाचे मोलाचे योगदान होते. गुप्ता यांना आता गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या निकालाची प्रतीक्षा आहे.














Leave a Reply