कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण पूर्वेतील लोक कल्याण पब्लिक स्कूलच्या आस्था नायकर व सेंट मेरी शाळेच्या देवांश राणे फलेंडर ग्रँड प्रिक्स या जागतिक स्केटिंग स्पर्धेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. राज्यातून आस्था आणि देवांश या दोघांचीच निवड या स्पर्धेसाठी झाली आह. तर भारताच्या संघात एकूण 12 खेळाडू आहेत.
ऑलम्पिक मधील सुवर्णपदक विजेते विलेन बार्टस्वींग दे त्यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान येथे गत पंधरा दिवस दोघेही सराव करत होते. आस्था आणि देवांशला राज्य स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पुष्पेद्र सिंग, श्रीपाद शिंदे, पवन ठाकूर त्यांचेही मार्गदर्शन भेटले. जागतिक स्पर्धेसाठी आस्था आणि देवांशला राज्याचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड, प्राध्यापक लक्ष्मण इंगळे, छत्रपती पुरस्कार विजेते अंकुर आहेर, सुभाष गायकवाड यांनी ही दोन्ही खेळाडूंना भेटून शुभेच्छा दिल्या.
आस्था 4 वर्षाची असल्यापासून स्केटिंग ह्या खेळामध्ये सराव करत असून. तिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची झालेली निवड ही खरच आमच्या कुटुंबासाठी आनंदाची बाब असून पुढेही तिने अनेक स्पर्धा मध्ये सहभाग घेऊन यश प्राप्त करत देशाचे नाव उज्वल करावे अशी प्रतिक्रिया आस्थाची आई सुप्रिया नायकर यांनी दिली.
तर देवांश स्केटिंग खेळात सुरुवात केल्यानंतर एवढी मोठी मजल मारेल ही आपेक्षा नव्हतीच. त्यांनी घेतलेली मेहनत आणि केलेला सराव कौतुकास्पद असून, आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये त्याची झालेली निवड हे त्याचाच फळ आहे. या स्पर्धेमध्येही नक्कीच यश प्राप्त करेल अशी मला खात्री असल्याचे देवांश चे वडील अविनाश राणे यांनी सांगितले.














Leave a Reply