बेस्टमध्ये ३२ वर्षे निष्कलंक, विनाअपघात प्रामाणिक सेवा देणाऱ्या शिवाजी तवटेंचा निवृत्ती समारंभ संपन्न

दिवा, ता. 16 जुलै (आरती परब) 
गेल्या ३२ वर्षांपासून बेस्टमधील विक्रोळी आगारात निष्कलंक, विनाअपघात प्रामाणिक सेवा देणाऱ्या शिवाजी तवटेंचा निवृत्ती समारंभ रविवारी त्यांच्या राहत्या अचला को.ऑप. हौ. सोसायटी या इमारतीच्या टेरेसवर सायं ५ वाजता संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरवात परमपूज्य श्री. अनिरुध्दबापू दिवा उपासना केंद्रामार्फत परमपूज्य अनिरुध्दबापू यांच्या पादुका पुजनाने झाली. त्यानंतर सत्संग आणि सुस्वर भजनाने संपूर्ण वातावरण आध्यात्मिक व आनंददायी झाले. बापूभक्तांनी १ तास सत्संग आणि सुरवर भजनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व मान्यवर पाहुणे आणि मित्रमंडळी, रहिवाशी मंत्रमुग्ध झाले.
अचला सोसायटीचे अध्यक्ष देवेंद्र वराडकर यांनी शिवाजी तवटे यांच्या ३२ वर्षाच्या निष्कलंक, विनाअपघात प्रामाणिक सेवेची प्रशंसा केली तसेच अचला सोसायटीतीत खजिनदार या पदावर गेली १२ वर्षे निस्वार्थ, प्रामाणिकपणाने काम करीत असलेल्या कामगिरीचे विशेष कौतुक केले. तसेच त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांच्याबरोबर काम करीत असलेल्या BEST च्या सेवेतील सहकार्यांनी तवटे यांच्यासोबत घालवलेल्या आठवणींना उजाळा देऊन त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तवटे यांच्या परिवारातील अडविलकर परिवार कोकाटे व कोदे परिवार यांची खास उपस्थिती होती. सोसायटीतील सेक्रेटरी आणि सभासद तसेच आजुबाजूच्या सोसायटीतील रहिवाशी व मित्रमंडळी या कार्यक्रमास सामिल झाले होते. त्या सर्वांनी तवटे यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि भेटवस्तु दिल्या.
हा सोहळा अतिशय हदयस्पर्शी आणि संस्मरणीय ठरला. शिवाजी तवटे यांच्या सेवा निवृत्ती सोहळा हा त्यांच्या कार्याची आठवण करुन देणारा आणि त्यांच्या कार्याची विशेष दखल आणि त्यांना सन्मानित करणारा क्षण होता. तवटे परिवारातर्फे स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सचिन जामदार यांनी केले. या कार्यक्रमास पंडित लोट, सुधीर मयेकर, सुरेंद्र मोरे, एकनाथ काटे, विजय साळुंखे तसेच दैनिक सकाळच्या पत्रकार सौ. आरती परब यांनी विशेष उपस्थिती दाखविली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. अशोक सावडेकर, सचिन जामदार, प्रथमेश तवटे, जयप्रकाश कोकाटे यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *