भाजपचे माजी नगरसेवक विश्वदीप पावर यांच्या कार्यालयात गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप 

डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली पूर्वेकडील भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या माध्यमातून कल्याण डोंबिवली महानगरपालितील शिवमार्केट प्रभाग क्रमांक 69  येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी नगरसेवक विश्वदीप पावर म्हणाले, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे दरवर्षी गोरगरीब विद्यार्थ्यांना लाखोच्या संख्येने वह्या वाटप करत असतात. शहारातील रिक्षाचालक व गॅस वितरण करणाऱ्यांच्या मुलांनाही वह्या दिल्या. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वॉर्ड अध्यक्ष माधुरी भिडे, महीला उपाध्यक्ष धरती गाडा, वंदना गोडबोले, संतोष मेस्त्री, गणेश पाटिल, अश्विनी गायकवाड, शोभा दिवे, अपर्णा सुरंजे, हेमलता संत, सायली सावंत, महेंद्र देशपांडे यांनी विशेष मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *