भाजपा माजी नगरसेविकेने घेतली दखल…त्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यास सुरुवात 

डोंबिवली ( शंकर जाधव ) :
डोंबिवली पश्चिमेकडील अनेक रस्त्याना खड्डे पडले असून नवापाडा येथील रस्त्यांवर खूपच खड्डे आहेत. डोंबिवली रिक्षाचालक संघटनेचे यावर आवाज उठवत उपोषणाचा इशारा दिला होता. भाजपा नगरसेविका विद्या म्हात्रे यांनी या समस्येकडे लक्ष देत पालिका प्रशासनाकडून या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास सांगितले. बुधवार 10 तारखेला या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा कामाला सुरुवात झाली.
भाजपा माजी नगरसेविका विद्या म्हात्रे म्हणाल्या, डोंबिवली पश्चिमेकडील कुंभारखानपाडा ते स्टेशनच्या दिशेने जाणारा रस्ता  काँक्रीटकरणासाठी मंजूर झाला आहे.काम. सुरु होण्याआधी  पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असून  खडीने बुजीविण्याचे काम सुरु आहे. तर येथील स्थानिक नागरिकांनी येथील रस्ते  काँक्रीटकरण केल्यास पावसाळ्यात त्रास होणार नाही.यावेळी भाजपचे पदाधिकाऱी राजेश म्हात्रे यांनी या रस्त्याचे काम सुरु असताना पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *