महाराजांच्या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा— आ. राजू पाटील

कल्याण: रोशन उबाळे 
कर्नाटक राज्यातील दावणगिरी जिल्ह्यातील होदेगिरी येथे छत्रपती शहाजी महाराज यांची समाधी आहे. ही समाधी दुर्लक्षित आहे. या प्रश्नाकडे ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी लक्ष वेधले आहे. या दुर्लक्षित समाधी स्मारकासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी द्यावा. हा निधी सध्या सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनातच मंजूर करावा अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.वाघ नखे इतकी महत्त्वाचे नाही तर महाराष्ट्रातील वास्तू सुधारा.
‘.          छत्रपती शहाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे स्मारक व्हावे याकरीता ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील हे गेल्या तीन वर्षापासून पाठपुरावा करीत आहे. त्यांच्या पाठपुरावाची राज्य सरकारने दखल घेतलेली नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. काल राज्य सरकारने विश्वविजेत्या भारतीय संघाला ११ कोटी रुपये देण्याचे घोषित केले आहे. भारतीय टिम जिंकली. देशाभिमानासह महाराष्ट्र अभिमानही राज्य सरकारने जपला पाहिजे. दुर्लक्षित असलेल्या छत्रपती शहाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या स्मारकासाठी राज्य सरकारने किमान १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करावा. हा निधी सध्या २
असलेल्या पावसाळी अधिवेशनात मंजूर करावा’ अशी मागणी मनसे आमदार पाटील यांनी केली आहे. ही मागणी मनसे आमदार पाटील हे पावसाळी अधिवेशनात करणार आहेत. त्याचबरोबर या प्रकरणी राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
ऐतिहासिक वास्तू दुर्लक्षित त्यात
शहाजी महाराजांची समाधी
          स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांचा १६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना मृत्यू झाला. शहाजी राजांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिवाजीमहाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजांनी राजपरंपरेप्रमाणे शहाजीराजांची उत्तरक्रिया केली व समाधी शिमोग्याजवळ होदेगिरी, जिल्हा दावणगिरी- कर्नाटक येथे बांधली.

दरम्यान महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला प्रेरणा देणाऱ्या छत्रपती शहाजी महाराजांची समाधी दुर्लक्षित असणे हे महाराष्ट्रासाठी दुर्देव आहे. या ठिकाणी समाधी स्मारक होणे गरजेचे आहेच आणि त्याकरिता महाराष्ट्र सरकारने यासाठी सढळ हस्ते मदत करणे अपेक्षित आहे. यासाठीच मनसेचे राजू पाटील यांनी आक्रमकपणे समाधी स्मारक निधीची मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *