कल्याण : महावितरणच्या डोंबिवली विभाग कार्यालयांतर्गत डोंबिवली पश्चिम उपविभाग क्रमांक चार व त्यांतर्गत तीन शाखा कार्यालयांचे स्थलांतर कंपनीच्या स्वमालकीच्या जागेत करण्यात आले आहे. उपविभाग चारसह गांधीनगर पश्चिम, कोपर रोड, जुनी डोंबिवली या तीन शाखा कार्यालयांचा यात समावेश आहे.
गणेश मंदिरच्या मागे, पंडित दिनदयाल रोड, कैलास भुवन बिल्डींग जवळ, डोंबिवली (पश्चिम) ४२१२०२ या नवीन पत्त्यावर शुक्रवारपासून (२१ जून) ही चारही कार्यालये कार्यान्वित होत आहेत. सध्या ही कार्यालये नाखे एव्हरेस्ट हाऊस, हॉटेल द्वारकाच्या वर, तीसरा मजला, रेल्वेस्टेशन जवळ, डोंबिवली पश्चिम येथे भाडयाच्या जागेत कार्यरत आहेत. संबधित ग्राहकांनी या नवीन बदलाची नोंद घेऊन सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.














Leave a Reply