कल्याण- शिवसेना उबाठाचे विधानसभा सह संघटक रूपेश भोईर यांच्या तर्फे प्रभाग क्रमांक 36 मध्ये रविवारी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. रहेजा गृहसंकुलात डॉक्टर हाऊस येथे आयोजित ह्या शिबिराचे उदघाटनाच्या वेळी शिवसेनेचे उपनेते अल्ताफ शेख, अरूण बागवे आणि नंदू जोशी समवेत शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मधुमेह, रक्त दाब, ईसीजी आणि डोळ्यांची तपासणी सोबतच अन्य तपासण्या सुद्धा करण्यात आल्या. एम्स च्या डॉक्टरांच्या टीम च्या सहयोगाने आयोजित या मोफत चिकित्सा शिबिरा बाबत बोलताना रूपेश भोईर यांनी सांगितलं की, पावसाळ्यात नागरिकांना शारीरिक आजार होऊ नये म्हणून या शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिरात शेकडो नागरिकांनी उपस्थिती दाखवून शिबिराचा लाभ घेतला.














Leave a Reply