कल्याण : रोटरीचे नवीन वर्ष 1 जुलै पासून सुरू झाले असून रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष म्हणून पराग कापसे यांनी पदभार स्वीकारला. पहिल्याच दिवशी अन्नपूर्णा दिन साजरा करण्यात आला. खिचडी साठी लागणारे धान्य, आधारवाडी कल्याण येथील एका अभ्यासिकेला तांदूळ 1 किलो आणि मूग डाळ 1/2 किलो वाटप करण्यात आले. सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात अन्नदान करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ कल्याणचे अध्यक्ष पराग कापसे, सचिव आत्माराम घाणेकर, प्रकल्प प्रमुख स्मृती पवार, सदस्य हनिफ सय्यद, वैशाली परदेशी, दिलीप कर्डेकर, कल्याण डायमंड्सचे अध्यक्ष अरविंद शिंदे, कल्याण डायमंड्सचे सचिव हिरामण क्षीरसागर, जिल्हा सचिव हरिश्चंद्र भोईर, असिस्टंट गव्हर्नर महेंद्र हिंगोराणी आदीजण उपस्थित होते.














Leave a Reply