रोटरी क्लब ॲाफ न्यु कल्याण तर्फे रक्तदान शिबिर

कल्याण :  रोटरीचे नविन वर्ष १ जुलै रोजी सुरू होते. या वर्षी रोटरी क्लब ॲाफ न्यु कल्याण चे २०२४-२५ वर्षाचे अध्यक्ष बिजु उन्नीथन तसेच सचिव रमेश मोरे हे आहेत. त्यांचा पहिला उपक्रम म्हणजे १ जुलै या डॉक्टर दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण व सेंट्रल रेल्वे मजदूर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १ जुलै  रोजी कल्याण रेल्वे स्टेशन फलाट क्रमांक एक व फलाट क्रमांक सात वर सकाळी १० ते संध्याकाळी ४ या वेळेत  रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी इनरव्हील क्लब ऑफ कल्याण, रोटरॅक्ट क्लब ऑफ अचीवर्स कॉलेज, रोटरॅक्ट क्लब ऑफ न्यू कल्याण यांचेही सहकार्य लाभणार आहे. तरी, “रक्तदान हे श्रेष्ठदान या उक्तीला अनुसरून नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी जोपासत या रक्तदान शिबिराला भरघोस प्रतिसाद द्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ न्यू कल्याण तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *