शहापुरात “5% दिव्यांग” निधी वितरित करण्याची प्रहारची मागणी…

चंद्रकांत देसले /शहापूर

शहापूर तालुक्यातील दिव्यांग नागरिकांचा हक्क प्रलंबित राहू नये म्हणून प्रहार जनशक्ती पक्षाने पुढाकार घेतला असून गुरुवार दिनांक 29 जानेवारी रोजी शहापूर गटविकास अधिकारी बी. एच. राठोड यांना एका निवेदनाद्वारे दिव्यांगांचा हक्काचा 5% निधी तत्काळ वितरित करण्याची मागणी करण्यात आली.
शहापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीने दिव्यांग 5% निधी वाटप केलेला नाही. त्यां संबंधितावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या मागणीमुळे शहापूर तालुक्यातील दिव्यांग समाजाच्या न्यायासाठी चळवळ पुन्हा एकदा गतीमान झाली आहे.प्रहार पक्षाने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर हा निधी लवकरात लवकर वितरित करण्यात आला नाही तर प्रहार जनशक्ती पक्षाकडून आंदोलन उभारले जाईल. या निवेदनावेळी शहापूर प्रहार तालुका अध्यक्ष वसंत पानसरे, सल्लागार वामन केदार, सचिव विनायक बोद्रे, युवा संघटक मयूर किरपण, विश्वास सातपुते तसेच प्रहारचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *