नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे देखील आयोजन
कल्याण : कुणाल म्हात्रे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कल्याण पूर्वेत विविध शासकीय योजना शिबिराला सुरवात झाली असून याठिकाणी नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे. कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांच्यावतीने कल्याण पूर्वेतील मंगल राघो नगर शिवसेना शाखेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज पासून या शिबिराला सुरवात झाली असून २४ जुलै पर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे.
या शिबिरात आयुष्मान भारत योजना कार्ड, आधारकार्ड व पॅनकार्ड लिंक, पॅनकार्ड (नविन व अपडेट्स), वयोश्री योजना जेष्ठ नागरिक, श्रमिक लेबर कार्ड (ई-श्रम) कार्ड, नाका कामगारांची नोंदणी, स्मार्ट कार्ड, मतदान कार्ड (नविन व अपडेट्स), महिला बाल संगोपन योजना, लेक लाडकी योजना, आभा कार्ड, ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन’ योजना, घरकाम करणाऱ्या महिलांची नोंदणी, माझी लाडकी बहीण योजना आदी योजनांचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याने नागरिकांना मतदानापासून वंचित रहावे लागले होते. त्यासाठी नविन मतदार नोंदणी विशेष मोहिम देखील घेण्यात आली असून कल्याण पूर्व विधान सभा मतदान करण्यासाठी मतदार यादी मध्ये नाव असणे आवश्यक आहे. मतदार यादीत नाव तपासणे नवीन नाव नोंदवणे किंवा असलेल्या नोंदी मध्ये दुरुस्ती करण्यासाठी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन कल्याण जिल्हा समन्वयक हर्षवर्धन पालांडे यांनी केले आहे.
यावेळी विलास तूरकणे, संदीप महाडीक, सूर्यकांत मोरे, आर्यन कदम, हर्षवर्धन पालांडे, रामचंद्र पाटील, समीर हिंदळेकर, शांताराम डिघे, योगेश चव्हाण, रमेश टिके, दत्ताराम नार्वेकर, गणपत घुगे, नितीन मोकल, राजश्री आगवणे, कविता महाडीक, संगिता गांधी, रामदास माकोडे, जगदीश तरे आदी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.














Leave a Reply