संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा 

Whatsapp Image 2025 01 27 At 4.13.03 Pm

कल्याण : संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सर्वोदय विद्यालय आणि आर. टी. न्यू इंग्लिश स्कूल  यांच्या संयुक्त विद्यमाने 76 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते कल्पेश पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

शाळेतील विद्यार्थ्यांनी या सोहळ्यात विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले . लहानग्या शिशु वर्गापासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, मानवी मनोरे, तलवार चालवणे, कराटे यांसारख्या कलागुणांचे दर्शन घडवले. या शाळेत गीता पठणासह विविध 16 विद्या शिकवल्या जातात. या ठिकाणी प्लंबिंग, कारपेंटरी, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिशियन, फॅशन डिझाइनिंग, फूड टेक्नॉलॉजी, तबला-हार्मोनियम वादन, रोपवाटिका व शेती यांसारख्या कौशल्यांचा विनाशुल्क अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकवला जातो, ही बाब निश्चितच अनुकरणीय असल्याचे मत या कार्यक्रमात कल्पेश पाटील यांनी व्यक्त केले . यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थांचा गुणगौरव करण्यात आला.
संकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळत आहे, हे निश्चितच प्रेरणादायी आल्याचे सांगत त्यांनी शाळेचे कौतुक केले .

याप्रसंगी संस्थेचे मुख्याध्यापक वीरेंद्र वसंत पाटील , सचिव तसेच भूमिपुत्र धर्माभिमानी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र वसंत पाटील आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *