[slim_seo_breadcrumbs]
निरोगी शरीरासाठी योगा महत्त्वाचा – कविता मोर्या

कल्याण : कुणाल म्हात्रे
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्व येथील सम्राट अशोक विद्यालयात योग दिन साजरा करण्यात आला. पतंजली योग समितीचे प्रशिक्षक कविता मोर्या, सुरेखा गायकवाड व मुकेश दवे यांच्याबरोबर विद्यार्थी आणि शिक्षकांनी योगासने केली.
योग प्रशिक्षक कविता मोर्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या योगा केवळ एक दिवस करून चालणार नाही सातत्याने योगासने करायला हवीत. शाळेने आठवड्यातून एक दिवस तरी योगासने करून घ्यायला हवेत. योग साधना सकस आहार व व्यायाम केल्याने प्रतिकारशक्ती वाढते. आरोग्य चांगले राहते. मुख्याध्यापक गुलाबराव पाटील यांच्यासह शाळेचे शिक्षक गणेश पाटील, नयना वाबळे, संगीता महाजन व शोभा देशमुख यांनी सहभाग घेतला. उपस्थितांचे आभार गणेश पाटील यांनी मानले.














Leave a Reply