साई आश्रय सेवा मंडळ गुरुपौर्णिमेनिमित्त पदयात्रा पालखी सोहळा शिर्डीकडे रवाना …

टिटवाळा:  श्रीक्षेत्र टिटवाळा ते श्री क्षेत्र शिर्डी अर्थात गावदेवी मंदिर ते साई मंदिर साई अश्रय सेवा मंडळाचे पदयात्री गुरुपौर्णिमेनिमित्त मोठ्या आनंदात साई नामाच्या गजरात शिर्डीकडे रवाना झाले आहेत. मांडेकर म्हणजे धार्मिक, वारकरी, संप्रदायिक, नेहमी हरिनामात तल्लीन व वर्षभर विविध धार्मिक उपक्रम करणारे ग्रामस्थ म्हणून पंचक्रोशीत सुप्रसिद्ध आहेत गेल्या 22 वर्षांपूर्वी या गावातील ग्रामस्थ आणि तरुणांनी साई आश्रय सेवा मंडळ स्थापन करून या मंडळाच्या माध्यमातून गावदेवी मंदिर मांडा ते साई मंदिर शिर्डी पालखी पदयात्रेला सुरुवात केली. पहिल्या वर्षापासूनच शेकडो साईभक्त भर पावसामध्ये आपल्या साईंचा आशीर्वाद घेण्यासाठी गुरुपौर्णिमेला नित्यनेमाने सहकुटुंबासह पोहोचतात. याच प्रमाणे याही वर्षी मंडळाच्या माध्यमातून अनेक दिवसांच्या तयारीनंतर हा पालखी सोहळा सुरुवात करण्यात आली पहाटे साईं बाबांच्या पादुकांचे पूजन, पालखी पूजन, पालखीचे दर्शन व प्रसाद, महाआरती अनेक उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून फुलांनी सजवलेल्या पालखीमध्ये साई मूर्ती पादुका ठेवून पालखी सोहळा सुरुवात करण्यात आली. या पालखी सोहळ्यात त मांडा टिटवाळा कल्याण आंबिवली अटाळी पंचक्रोशीतील अनेक नामांकित राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेतात तसेच शेकडो  किलोमीटर चालून काही मान्यवर शेवटच्या दिवसापर्यंत पालखी सोबत असतात, या पालखी सोहळ्यासाठी मांडे गावातील सर्व ग्रामस्थ आपल्या परिवारासह पायी शिर्डी कडे रवाना झाले. शेकडो माता-भगिनी पालखी सोबत मुखांमध्ये साईनामाचा गजर करत  शिर्डीकडे रवाना झाले प्रत्येक चौका चौकामध्ये अनेक साई भक्त माय माऊली साई पालखी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी आरती घेऊन उभ्या होत्या हा अनोखासहळा दरवर्षी न चुकवता अनेक साईभक्त मांडा ते टिटवाळा मंदिर पर्यंत तरी आवर्जून सामील होतात.

साई आश्रय सेवा मंडळाचे सर्वच पदाधिकारी व  सहकारी साई भक्तांना या पालखी सोहळ्यामध्ये कशाचीही कमी होणार नाही यासाठी स्वतः जातीने लक्ष देतात अनेक साई भक्त पालखी आपल्या खांद्यावर घेण्यासाठी हिरगिरीने पुढे येऊन पालखीचा मान करतात या आनंद सोहळ्यात जणूकाही मांडा टिटवाळा येथे शिर्डीच उतरली असे चित्र दिसून आले. या सोहळ्या दरम्यान साई पालखी मंडळाने आयोजित केल्याप्रमाणे दुपारचा मुक्काम सायंकाळचा अल्प अराम आणि रात्रीचा मुक्काम अशा प्रकारे सात दिवस नियमित पदयात्रा करून श्री क्षेत्र शिर्डी येथे पोहोचणार असून शनिवार दिनांक २० जुलै  रोजी श्री क्षेत्र शिर्डी साईंच्या चरणी नतमस्तक होणार आहे तेथे भंडारा काल्याच्या महाप्रसादाच्या नंतर पुन्हा श्री क्षेत्र टिटवाळा गावदेवी मंदिर येथे मुक्कामी पोहोचतील. या आनंदी सोहळ्यानंतर गावदेवी मंदिर मांडा येथे भव्य असा साई भंडारा आयोजन केला असून सर्व साई भक्तांनी या भंडा-यासाठी  उपस्थित रहावे असे आवाहन साई आश्रय सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *