जि. प. शाळा वाकलवाडीत शालेय साहित्य वाटप

जिल्हा परिषद शाळा वाकलवाडी शाळेत शालेय साहित्य वाटप

कल्याण : कुणाल म्हात्रे 

 मुलांच्या सर्वांगिण विकासाठी शालेय शिक्षण घेणे गरजेचे असून एकही मुल शिक्षणापासून अलिप्त राहु नये आणि सामाजिक गरीबीमुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीला बाधा येऊ नये म्हणून गरजूंना शालेय साहित्य वाटप उपक्रम राबविण्यात येत असल्याचे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष किरण शिरसाठ यांनी केले.

रविवारी मुरबाड तालूक्यातील वाकलवाडी, टोकावडे येथिल जिल्हा परीषद शाळेत समन्वय प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बृन्हमुंबई महानगरपालिकेचे वरीष्ट अधिकारी सुभाष सांबरे यांनी सांगितले की, शिक्षणाची गोडी विद्यार्थ्यांना निर्माण झाली पाहिजे म्हणून आनंददायक शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे शिक्षण घेण्याची सोपी कला कशी आत्मसात करावी याबाबत सल्ला दिला.

यावेळी समन्वय प्रतिष्ठानचे संस्थापक अॅड. जनार्दन टावरे, कार्यक्रमाचे आयोजक सुहास मोहोळ, संतोष खेताडे, कुणाल शिंदे, आप्पा भोसले, शंकर पाटील, मंगेश टेंबे, सचिन सावंत, प्रविण मालूसरे, प्रमोद थुळ, सुरज देसाई, संस्थेचे पदाधिकारी, तसेच ग्रामपंचायत सरपंच माधूरी शेट्ये, सरपंच केशव शिद, आदीवासी समाजाचे कार्यकर्ते चंदू पारधी, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन साोंगाळ, शाळेतील शिक्षक मधूकर अनभुले, स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी एकुण ३६ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅड. सुनिल उबाळे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करण्यात आली. यावेळी नैसर्गिक साधन संपत्तीची वाढ होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवडीचा संदेश देऊन पर्यावणाचे संरक्षण करण्याचा सल्ला दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *