प्रदर्शन पाहण्याकरता डोंबिवलीकरांची गर्दी….
डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी छंद म्हणून जोपासलेल्या दर्जेदार कलाकृतींना कलाक्षेत्रात वाव मिळावा तसेच त्यांच्या कलाकृतींतून सामाजिक कार्यास हातभार लाभावा या हेतूने दीपकला फाऊंडेशन आणि डोंबिवलीकर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सहकार्याने “वुमेन्स आर्ट फेअर” – आर्ट फॉर चॅरिटी चे आयोजन करण्यात आले आहे.स्वामी समर्थ प्रगट दिनी शुक्रवार २० मार्च तारखेला डोंबिवलीतील आनंद बालभवन येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे.प्रदर्शन उदघाटनप्रसंगी अनिमेशन क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले डोंबिवलीकर प्रभू कापसे,- प्रसिद्ध कलाकार प्राची किल्लेकर, चंद्रशेखर संत, निवृत्त मुख्याध्यापिका दीपाली काळे, भाजपा डोंबिवली ग्रामीण पश्चिम मंडळ अध्यक्षा प्रिया जोशी या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत आयोजक दीपक जाधव यांनी केले.
गुढीपाडवा आणि वुमेन्स डे चे औचित्य साधून सांस्कृतिक नगरी डोंबिवली मध्ये प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. सदर प्रदर्शनामध्ये डोंबिवली व महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांनी छंद म्हणून जोपासलेल्या चित्रकला, शिल्पकला, रेझिन आर्ट, मंडला आर्ट, मधुबनी आर्ट, सिरेमिक आर्ट, मोजेक आर्ट, पारंपारिक कला, हस्तकला इत्यादी अनेक कलाकृतींचा समावेश करण्यात आला असून कलेचा अनोखा संगम पाहायला मिळाला. यावेळी प्राची किल्लेकर म्हणाल्या, स्त्रीवर खूप जबाबदारी असतात. महिलांनीकला जोपासली पाहिजे.कलेचा महत्वाचा पाया हा निरीक्षण असते. त्यानंतर इमॅजिनेश…सराव वाढावा.जगात, निसर्गात खूप काही आहे ते पाहून छान छान चित्र काढता येऊ शकतात.चिकाटी असल्यास जग जिंकता येते. चंद्रशेखर संत म्हणाल्या, आज खूप पवित्र असा स्वामी समर्थ प्रगट दिन आहे. कलेबाबत एकाग्रता महत्वाची.. कलात्मा हे प्रत्येकाच्या आत असतो.प्रत्येकाने कला जोपासायला हवी.मन लावून काम करणे हे कलाकाराचे तर तीन दिवसीय प्रदर्शन असून यात महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
















Leave a Reply