मनसे एमआयडीसी कार्यालयावर काढणार मोर्चा – आमदार प्रमोद ( राजू ) पाटील
डोंबिवली ( शंकर जाधव ) :
कल्याण- डोंबिवली शहरात पाणी समस्या गंभीर होत असून पालिका कार्यालयावर, एमआयडीसी कार्यालयावर नागरिकांनी मोर्चा काढला.त्रस्त नागरिकांनी ठिय्या आंदोलन करून प्रशासनाला जाब विचारूनही पाणी समस्या सुटली नाही. माझे एवढेच म्हणणे आहे कि लोकसभा निवडणूकिच्या आधी दोन महिने जी जादू करून नागरिकांना पाणी दिले तीच जादू करून आताही नागरिकांना पाणी दया असे मनसे आमदार प्रमोद ( राजू ) पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले.सोमवार 9 तारखेला मनसे आमदार पाटील यांनी एमआयडीसी, महावितरण कंपनी आणि कल्याण – डोंबिवली महानगरपालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली.
पाणी समस्येबाबत घेण्यात आलेल्या या बैठकीत आमदार पाटील यांनी नागरिकांना योग्य दाबाने पाणी पुरवठा करा असे सांगितले.पालिका प्रशासन, एमआयडीसी हे पाणी पुरवठा करत असून यात अमृत योजना आल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळेल असे वाटते. मात्रएमआयडीसी विभाग नेहमीच पाणी पुरवठा करणारे खोटे आकडे देत असल्याने जनतेचा रोष हा एमआयडीसीवर आहे.पालिका आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माहिती दिली. काही ठिकाणचे अमृत योजनेचे काम थांबले असून ते गतिमान कसे करता येईल त्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर पाणी समस्येबाबत मनसे एमआयडीसी कार्यालयावर मोर्चा काढू.विधानसभेत तर अनेक वेळेला बोललो आहें कि कल्याण – डोंबिवलीचे हक्काचे 140 एमएलडी पाणी कोटा आहे तो पळविण्याचा घाट काही लोकांचा चालला आहे.तसेच अमृत योजनेचे 105 एमएलडी मिळावे अशी मागणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. तो साठा तरी कल्याण डोंबिवलीला मिळावा यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधीही उपस्थित केली होती.














Leave a Reply