कल्याण : कुणाल म्हात्रे
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील वाहतूकीची कोंडी कमी व्हावी आणि पादचा-यांना रस्त्यावरील रहदारीतून ये-जा करणे सुलभ व्हावे या दृष्टीकोनातून महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांच्या निर्देशानुसार व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे उपायुक्त अवधुत तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली ई प्रभागाचे सहा.आयुक्त भारत पवार यांनी कल्याण शिळ रस्त्यावर लावणेत आलेल्या ५ दुचाकी व ३ चारचाकी अशी एकूण ८ बेवारस, भंगार वाहने जप्त करुन खंबाळपाडा येथील वाहन तळावर जमा केली. तसेच रस्त्यावरील बांबुच्या सहाय्याने बांधलेल्या १८ झोपड्या व पत्र्याच्या सहाय्याने बांधलेले १५ गॅरेज व ४ टप-यांवर निष्कासनाची धडक कारवाई नुकतीच केली.
हि कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, महापालिका पोलीस अधिकारी व कर्मचारी, मानपाडा पोलीस अधिकारी व कर्मचारी, वाहतूक विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मदतीने आणि टोइंग मशीन, हायड्रा, डंपर, जेसीबी व १० मजूर यांच्या सहाय्याने करण्यात आली.














Leave a Reply