“रिंगरूट रखडला, रस्ताच ‘बाजार’ बनला; वासुंद्री रोडवरील अनधिकृत आठवडी बाजारावर अखेर महापालिकेचा हातोडा

टिटवाळा : अजय शेलार 

टिटवाळा पश्चिमेतील वासुंद्री रोडवरील गणेश प्रतिमा चौक परिसर गेल्या अनेक महिन्यांपासून अक्षरशः अराजकतेचे केंद्र बनला होता. अर्धवट आणि अनेक वर्ष रखडलेल्या रिंगरूटच्या मोकळ्या जागेचा फायदा घेत येथे दर आठवड्याला भरवला जाणारा अनधिकृत बाजार नागरिकांना त्रासदायक ठरत होता. रस्त्यावर हातगाड्यांची रांग, सततचे फेरीवाल्यांचे मोठ्याने कर्कश ओरडणे,  टपऱ्यांचे जाळे आणि तात्पुरत्या शेड्समुळे मुख्य मार्गच व्यापाऱ्यांच्या ताब्यात गेल्याचे चित्र होते. अखेर वाढत्या तक्रारी, संताप आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे महापालिकेने धडक कारवाई करत हा बाजार बंद केला आणि अतिक्रमण हटवले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *