पालघर पोलीस स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई – १६ लाखांचा गुटखा जप्त, तीन आरोपी अटकेत

Whatsapp image 2025 08 28 at 9.16.42 pm

निलेश कासट पालघर

पालघर जिल्हा पोलीसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (L.C.B) मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त केला आहे. या कारवाईत एकूण १६ लाख ६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर हिमालय पंजाब ढाबा या ठिकाणी संशयित आयशर टेम्पो (क्र. डीडी ०३ आर ९२७७) अडवण्यात आला. या वाहनातून ६,०६,१०० रुपयांचा गुटखा व सुगंधित पानमसाला आढळून आला. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेला टेम्पो (किंमत १० लाख रुपये) देखील जप्त करण्यात आला.
या कारवाईत आरोपी मोहम्मद अरबाज जमीरउल हक (वय २२, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश),दिलशाद शमशाद अली (वय २०, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश),नेनाराम छबुजी गुजर (वय ४८, रा. राजसमंद, राजस्थान) यांना ताब्यात घेऊन
आरोपींना अटकपूर्व वैद्यकीय तपासणीनंतर कायदेशीर ताब्यात घेण्यात आले असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील सावंत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अंमलदार नरेश घाटाळ, बजरंग गोविंद अमनवाड व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणी सरकारतर्फे फिर्याद दाखल करण्यात आली असून गुन्हा नोंदवून तपास कार्यवाही सुरू आहे. या कारवाई मध्ये जप्त मुद्देमालाची एकूण किंमत – १६,०६,१०० रुपये असून गुटखा व पानमसाला – ६,०६,१०० रुपये आहे. काही दिवसा पूर्वीच चारोटी येथील घोळ टोल नाक्या वर ही स्थानिकाच्या मदतीने एका इनीव्हा कार मधून अवैध वाहतुक होणाऱ्या जवळपास ९ लाखाच्या वर अवैध गुटखा जप्त केला होता. सध्या गणपती उत्सव सुरु असल्याने पालघर जिल्ह्यात गुजरात हुन मोठ्या प्रमाणत गुटखा ची वाहतूक होत असल्याची माहिती मिळत आहे. मात्र पालघर स्थानिक गुन्हे शाखे ची धडक कारवाई होत असल्याने गुटखा माफिया यांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *