१ लाख ११ हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; कल्याण तालुका पोलिसांच्या तपासाला मोठे यश
टिटवाळा : मांडा-टिटवाळा परिसरातील सांगोडे गावात घरात घुसून तब्बल १ लाख ११ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या टोळीचा कल्याण तालुका पोलिसांनी छडा लावला आहे. गुन्हा घडताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून, या कारवाईमुळे सांगोडे गावातील घरफोडी प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले आहे.
२८ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ७ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास सांगोडे गावातील ६० वर्षीय महिलेच्या घरात तीन अनोळखी इसमांनी प्रवेश केला. घरातील तसेच महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरून आरोपींनी पोबारा केला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.
चोरट्यांनी लंपास केलेल्या ऐवजामध्ये अंदाजे दीड तोळे वजनाची सोन्याची कर्णफुले व वेल, दीड तोळे वजनाची चपटी सोन्याची चैन, एक तोळे वजनाची मोहनमाळ आणि दोन लॉकेट यांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे १ लाख ११ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
गुन्हा दाखल होताच कल्याण तालुका पोलिसांनी तपासाला वेग दिला. उपलब्ध माहिती, संशयितांची ओळख आणि विविध तपासाच्या दिशांचा बारकाईने मागोवा घेत पोलिसांनी संशयित आरोपींपर्यंत मजल मारली. अखेर चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.
प्राथमिक माहितीनुसार, आरोपी अंदाजे २० ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. फिर्यादीने दिलेल्या वर्णनानुसार, त्यापैकी दोन इसम सावळ्या रंगाचे तर एक इसम गोऱ्या रंगाचा असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे. गुन्ह्याच्या तपासासाठी फॉरेन्सिक व्हॅनचीही मदत घेण्यात आली आहे.
दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत झाला आहे का, या गुन्ह्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि परिसरातील इतर चोरीच्या घटनांशी या आरोपींचा काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात













Leave a Reply