राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

आरोपी निखिल मानेवर  कडक कारवाई करण्याची राष्ट्रवादीच्याच महिला कार्यकर्त्यांची मागणी
कल्याण : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान झालेल्या ओळखीमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या विद्यार्थी सेलच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्याच महिला कार्यकर्तीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याणच्या खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये निखिल माने याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने याच्या या वर्तणूकीनंतर वरिष्ठांनी त्याची राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असून या आरोपीवर कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकारी पूनम मढवी यांनी पोलिस आयुक्तांकडे केली आहे.
      याबाबत बोलताना राष्ट्रवादीच्याच पूनम मढवी यांनी सांगितले कि, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे कोकण विभाग अध्यक्ष किरण शिखरे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्षाचे काम मी आणि माझी टीम काम करीत होती. त्यांच्या टीम मधील एका महिलेला  निखिल माने याने घाणरडे मँसेज, घाण घाण शब्द  वापरणे, हे सगळे उद्योग त्यांने केले आहेत. याबाबत त्यांनी निखिल माने याची पक्षातून हक्कलपट्टी करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात मढवी यांनी किरण शिखरे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी शिखरे यांनी माने याला समजूत दिली. मात्र तरीही माने याने त्यांचे ही ऐकले नाही.
या नंतर पार्टी आँफिसला तक्रार करून त्याला पदावरून काढण्याची मागणी केली. अन्यथा आम्ही काम करणार नाही असा इशारा दिला असता पक्षाने निखिल माने याची राष्ट्रवादी पक्षातून हकालपट्टी केली. यानंतर देखील निखिल माने याच्याकडून संबंधित पीडित महिलेला त्रास देणं सुरू होतं. तसेच कारवाई केल्याच्या रागातून राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेसचे पदाधिकारी किरण शिखरे यांच्या विरोधात सोशल मिडियावर अपप्रचार सुरू होता.
यामुळे पीडित महिलेने याबाबत खडकपाडा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केली असता पोलिसांनी निखिल माने विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आम्हांला चांगल्यां प्रकारे सहकार्य केले असून पक्षाने देखील सहकार्य केले आहे. निखिल माने याने एकाच मुलीला नाही. तर भरपूर मुलींशी अशी वागणूक केली आहे. आता तर आम्हाला एकच पुरावा भेटलेला आहे. दुसरे पुरावे देखील आमाच्याकडे आहेत. पोलिसांनी यासंदर्भात माने याला अटक करत कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी असल्याचे पुनम मढवी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *