लोकमान्य गुरुकुल क्रिडा संकुलाचा उपक्रम
डोंबिवली : आजकाल लहान लहान शिशु वर्गातली मुलंही कायम हातात मोबाईल घेऊन असतात किंवा TV च्या पडद्यावर डोळे लावून बसलेली असतात. Reels, clips आणि online games यांच्या आभासी जगातून मुलांना बाहेर काढून मोकळ्या मैदानात आपल्याच वयाच्या सावंगड्यांबरोबर छोटे छोटे खेळ खेळण्याची संधी लोकमान्य गुरुकुल क्रीडा संकुलाने उपलब्ध केली आहे. MIDC निवासी विभागात या क्रीडा संकुलाने turf ground व अन्य सुविधा तयार केल्या आहेत.
शनिवार दिनांक १४ मार्च २०२६ या दिवशी सायंकाळी ५-०० वाजता संपन्न होणाऱ्या या “GAME CLUBBING ” मधे ३ ते ८ या वयाच्या छोट्या मुलांसाठी sack race, hip-hop ring, balls यांचा वापर करून दोन मिनिटांचे अनेक खेळ या मधे खेळले जातील. यातील प्रत्येक खेळातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मुलांना रु. १,०००/-, रु. ७५०/-, रु. ५००/- अशी रोख बक्षीसंही देण्यात येणार आहेत. मुलांच्या पालकांसाठीही काही खेळ आयोजित केले जातील असे आयोजकांनी सांगितले.
सहभागी होणाऱ्या प्रत्येक मुलाला Participation Certificate दिले जाईल तसेच snacks ची व्यवस्था ही करण्यात आली आहे.
आपल्या मुलाचा screen time कमी करून त्याने मोकळ्या हवेत खेळाचा आनंद घ्यावा यासाठी त्याचे नाव GAME CLUBBING मधे नोंदवावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
नाव नोंदणीसाठी संपर्क :- श्रीकांत श्रीखंडे 8356824997
















Leave a Reply