आधारवाडी कारागृहाबाहेर वाजवले फटाके…तिघांना अटक, एक फरार

कल्याण ( शंकर जाधव ) :

कल्याण शहरातील आधारवाडी कारागृहाबाहेर फटाके वाजविल्याची घटना घडली होती. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमात व्हायरल झाला होता. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली. असून एका आरोपीचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित जगदाळे, क्षितीज भगत आणि आकाश खडसे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अटकेनंतर पोलिसांनी या तिघांची धिंड काढली.उल्हासनगरातील कुख्यात आरोपी सतीश उर्फ सत्या भाई कांबळे यांच्या वाढदिवसानिमित्त ही आतिषबाजी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

व्हिडीओ पहा : https://www.youtube.com/shorts/0j6-Wg2vu0o

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *