गोवेलीमध्ये आरोग्याचा महाउत्सव; 600 हून अधिक नागरिकांना मोफत उपचारांचा लाभ


मान्यवरांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय महाआरोग्य शिबीर उत्साहात पार
टिटवाळा, वार्ताहर  : कल्याण तालुक्यातील गोवेली ग्रामीण रुग्णालय परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय महाआरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून तब्बल 600 हून अधिक नागरिकांनी विविध आरोग्य सेवांचा लाभ घेतला. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, जिल्हा परिषद ठाणे व पंचायत समिती कल्याण यांच्या मार्गदर्शनाखाली दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पुढाकाराने हे शिबिर पार पडले. आरोग्याचा महाउत्सव या ठिकाणी संपन्न झाला .या शिबिराचे उद्घाटन नायब तहसीलदार सत्यजित चव्हाण यांच्या हस्ते झाले, तर दीपप्रज्वलन जीवनदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक वाघ यांनी केले. यावेळी गटविकास अधिकारी रघुनाथ गवारी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आशा मुंजाळ, मंडळ अधिकारी प्रिती घुडे, टिटवाळा मंडळ अधिकारी चेतन पष्टे, तसेच विविध विभागांचे अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिपलक्ष्मी मेश्राम यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.शिबिरात आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, वयोवंदना कार्ड नोंदणीसह सिकलसेल तपासणी, ताप निदान, एक्स-रे, बीपी व शुगर तपासणी अशा विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच स्त्रीरोग, अस्थिरोग, त्वचारोग, बालरोग, क्षयरोग, मोतीबिंदू तपासणी, एचपीव्ही लसीकरण, मेमोग्राफी यांसारख्या तज्ज्ञ सेवाही नागरिकांना देण्यात आल्या. विशेष म्हणजे, शिबिरात केवळ कल्याणच नव्हे तर शहापूर व मुरबाड तालुक्यातील नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.
यावेळी एचपीव्ही लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी बाबतीत बच्छाव यांच्या टिमच्या वतीने  पथनाट्य सादर करण्यात आले, ज्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. शिबिरातील सर्व स्टॉल्सना भेट देत मान्यवरांनी सेवा व्यवस्थेची पाहणी केली आणि आरोग्याच्या महाउत्सवात काहींनी स्वतःही तपासण्या करून घेतल्या.

हे शिबीर यशस्वी होण्यासाठी दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आशा वर्कर्स, वैद्यकीय कर्मचारी तसेच डॉ. पूनम जयकर, डॉ. भावना राठोड, डॉ. गौरव परदेशी आणि सदस्य, मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान, मूल्य मापन समिती. संजय कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थित मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा शिबिरांची गरज अधोरेखित केली.गोवेली येथील या आरोग्याच्या महाउत्सवाला अभूतपूर्व प्रतिसाद पाह्यला मिळाला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *