वाशिंद : हनुमान कॉलनी परिसरात यंदाचा हनुमान जन्मोत्सव अत्यंत उत्साह, भक्तिभाव आणि धार्मिक वातावरणात मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भक्तांची गर्दी उसळली होती आणि संपूर्ण परिसर ‘जय हनुमान’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने विधिवत सत्यनारायणाची पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावून भक्तिभावाने दर्शन घेतले. त्यानंतर हनुमान मंदिरापासून रायखलपाडा पर्यंत भव्य पालखी सोहळा काढण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जयघोषात निघालेल्या या पालखीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. संध्याकाळी हरिपाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हरिपाठात सहभाग घेतला. रात्री ८ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादासाठी मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यामुळे कार्यक्रमाची भव्यता आणि लोकांचा उत्साह स्पष्टपणे जाणवत होता. मंदिर परिसर भगवे झेंडे आणि आकर्षक लाईटिंगने सजवण्यात आला होता. संपूर्ण परिसरात दिवसभर उत्सवी आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. महाप्रसादनंतर भाविकांनी भजनाचा कार्यक्रम आयोजित करून भक्तीचा रंग अधिकच खुलवला. हनुमान कॉलनीतील या उत्सवाने सामाजिक ऐक्य, श्रद्धा आणि परंपरेचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला, असे भाविकांनी सांगितले.














Leave a Reply