संघवी इस्टेट साई बाबा मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त साई भंडारा; भक्तिभावाचा उत्स्फूर्त जल्लोष

रिपोर्टर : श्री स्वप्निल शिंदे, कल्याण

कल्याण : हनुमान जयंतीच्या पावन पर्वानिमित्त संघवी इस्टेट येथील साई बाबा मंदिर परिसरात श्री साईकृपा उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही साई भंडारा व महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक सोहळ्याला परिसरातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून संपूर्ण वातावरण भक्तीमय आणि आनंदमय झाले होते.

कार्यक्रमादरम्यान मोठ्या जल्लोषात आणि श्रद्धाभावाने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. साई नामस्मरण, भजन आणि भक्तिगीतांच्या सुरांनी मंदिर परिसर भारावून गेला होता. सुमधुर आणि सुश्राव्य साई भजनांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे उपस्थित भाविकांना अध्यात्मिक आनंदाचा अनोखा अनुभव मिळाला.

या कार्यक्रमाचे संस्थापक माननीय श्री अर्जुन शांताराम भोईर असून आयोजनाची जबाबदारी श्री मयूर अर्जुन भोईर यांनी समर्थपणे सांभाळली. त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडला.

साई भंडारा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनीही मोठे योगदान दिले. यामध्ये श्री स्वप्निल (बंटी) थोरात, श्री बाबाजी वाकळे, श्री विनोद (मंगलम किराणा) आणि श्री सचिन दिवेकर यांनी परिश्रम घेत कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

दिनांक २ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमाने परिसरात भक्ती, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. साई भक्तांच्या उपस्थितीने हा सोहळा अधिकच उत्साही आणि संस्मरणीय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *