शब्दांची क्रांती, विचारांची दिशा! ‘दिशा दर्शक’ कविता संग्रहाचे भव्य प्रकाशन टिटवाळ्यात 

टिटवाळा : कल्याण तालुक्यातील नडगाव गावाचे सुपुत्र, भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य आणि संवेदनशील कवी रघुनाथ भोईर यांच्या ‘दिशा दर्शक’ या प्रभावी कविता संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते टिटवाळा पश्चिम येथील मांडा बौद्ध विहारात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक बौद्ध संस्कार विधीने झाली. बौद्धाचार्य उघडे गुरुजी व बौद्धाचार्य रामचंद्र पवार यांनी विधी पार पाडत कार्यक्रमाला आध्यात्मिक रंग दिला. त्यानंतर महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

या सोहळ्यात विचारमंचावर साहित्य, समाज आणि राजकारण क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. ज्येष्ठ साहित्यिक शुक्राचार्य गायकवाड, कवी जयवंत सोनवणे, बी. ए. जाधव, लेखक रघुनाथ भोईर, ज्येष्ठ पॅंथर नेते प्रा. एकनाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत भोईर, रिपाइंचे ठाणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भालेराव, प्रमोद जाधव, नगरसेवक बंदेश जाधव, विजय भोईर, अभिमन्यू भालेराव, डॉ. संदीप भालेराव, शीलाताई तायडे, शेखर लोणे, प्रभाकर जाधव, पत्रकार राजू टपाल, विलास भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम विजय भोईर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. सुर्यकांत भोईर यांनी प्रभावी प्रास्ताविक करत कवितेच्या सामाजिक भानावर प्रकाश टाकला, तर तुषार वैध यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली.

‘दिशा दर्शक’ या कविता संग्रहात तथागत भगवान गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाबाई यांच्या विचारधारेचा प्रभाव जाणवतो. मानवी जीवन, सामाजिक परिवर्तन आणि समतेचा संदेश या कवितांमधून प्रभावीपणे व्यक्त होत असून, हा संग्रह समाजाला नवी दिशा देणारा ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

लेखक रघुनाथ भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी बी. के. गायकवाड, सनी जाधव, दिलीप भोईर, संजय भालेराव, सुनील भोईर, सुभाष पंडित, नितीन गायकवाड, विकी जाधव, बंडू भोईर, रमेश गायकवाड, रवि गायकवाड, भरत भालेराव यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी एकता मित्र मंडळ नडगाव, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (मांडा टिटवाळा), सिद्धार्थ बुद्ध विहार समिती व उत्थान समिती यांनी विशेष सहकार्य केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पत्रकार विलास भोईर यांनी करत उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *